logo

समृद्धी महामार्गावरील अपघातात सुलतानपूर येथील एक ठार, दोन जखमी

इरफान शाह आयमा न्युज मेहकर (बुलढाणा) :- सोयरिकीच्या संदर्भाने चारचाकीवाहनाने समृद्धी महामार्गावरून
जालना येथे जात असताना देऊळगाव
राजानजीक अचानक वाहन उलटून झालेल्या अपघातामध्ये एकजण ठार झाला, तर दोनजण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील गजानन शिवाजी हरणे (६०) हे त्यांच्या दोन नातेवाइकांसह सोयरिकीच्या संदर्भाने कारने (क्र. एमएच ३७ व्ही ८४७९) जालन्याकडे जात होते. समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक अचानक त्यांची कार उलटून अपघात झाला. त्यात गजानन हरणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे शालक बाळू वालकर (रा. चायगाव, ता. मेहकर) व चालक रिसोडकर महाराज है जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार करण्यात येत आहे. अपघाती मृत्यू झालेल्या गजानन हरणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन
मुली असा आप्त परिवार आहे.

14
517 views